दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य
Jalna Crime News: एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना.
जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा मुलांसह रात्री मृतदेह गावातील नदी जवळील एका विहिरीमध्ये आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मयत महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकुन त्यानंतर स्वतःही उडी घेतली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. सविता खरात असे मयत महिलेचे नाव असून यात 5 वर्षीय भावेश खरात आणि 3 वर्षीय आबा खरात या चिमुकल्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू असून कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Mother ends life by jumping into well with two toddlers