Home अहमदनगर अहमदनगर: घरात घुसून मुलीचा विनयभंग

अहमदनगर: घरात घुसून मुलीचा विनयभंग

Breaking News | Ahmednagar: सुट्टीमध्ये मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना.

Molested of a girl by breaking into the house

जामखेड: सुट्टीमध्ये मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना जामखेड तालुक्यातील सारोळा येथे गुरूवारी घडली. अविनाश रामदास सगळे (२२, रा. सारोळा, ता. जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या सशयिताचे नाव आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे ती मामाच्या गावी आली होती. गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आजी शेतात गेलेली असताना याचा गैरफायदा घेत जवळ राहणारा अविनाश सगळे हा जबरदस्तीने घरात घुसला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केले तसेच ‘तु माझ्या बरोबर लग्न केले नाही तर मी फाशी घेईल’ अशी धमकी दिली. आजी समोरच्या दरवाजातून येताना दिसताच संशयित सगळे हा मागील दरवाजातून पळून गेला. त्यानुसार त्यावर पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली असुन न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

Web Title: Molested of a girl by breaking into the house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here