Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

अहिल्यानगर:  बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

Breaking News | Ahilyanagar Crime: दुपारच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मात्र, काल सकाळी त्याचा मृतदेह परिसरातील पडक्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

missing boy's body found in well

राहुरी: राहुरीतील येवले आखाडा येथील तुषार शेटे हा अल्पवयीन मुलगा राहत्या घरातून शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मात्र, काल सकाळी त्याचा मृतदेह परिसरातील पडक्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका

तुषार गोरक्षनाथ शेटे (वय १६) हा ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बेपत्ता झाला होता. त्यावेळी तुषारच्या घरातील मंडळींनी त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, तो कोठेही मिळून न आल्याने याबाबत चुलते जालिंदर हौशिनाथ शेटे रा. येवले आखाडा. राहुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८८२/२०२५ नुसार भारतीय न्याय दंड संहिता १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दि. ११ ऑगस्ट रोजी तुषार शेटे राहत असलेल्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या बाळासाहेब जयराम लगे यांच्या पडक्या विहिरीतून वास येऊ लागल्याने काहींनी तेथील विहिरीत पाहीले असता तुषार याचा मृतदेह पाण्यावर तरंगत

असल्याचे दिसले. घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक तुळशीदास गीते व पो.कॉ. संदीप ठाणगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तुषार याचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून वर काढून राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठवला. काल तुषारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तुषारवर मोठ्या शोकाकूल वातावरणात येवले आखाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

Breaking News: missing boy’s body found in well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here