Home अहिल्यानगर अहिल्यानगर: चप्पल दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

अहिल्यानगर: चप्पल दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

Breaking News | Ahilyanagar: एका गावात चप्पल बदलण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुकानात विनयभंग.

Minor girl molested by slipper shopkeeper

जामखेड : जामखेड पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात चप्पल बदलण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुकानात विनयभंग करण्यात आला. या संदर्भात १७ जुलै रोजी जामखेड पोलिस ठाण्यात संबंधित दुकान मालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावातील एका दुकानात चप्पल बदलण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानदार गफार निजाम शेख (वय ३४, रा. नन्नज) याने तिचा अश्लील हावभाव करून आणि हात ओढून विनयभंग केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, मुलीने घरी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, ती तिच्या वडिलांसोबत गेली आणि जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गफार शेखविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत.  

Breaking News: Minor girl molested by slipper shopkeeper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here