Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोट दुखू लागल्याने उघडकीस

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोट दुखू लागल्याने उघडकीस

Breaking News | Ahmednagar:  अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला चहासाठी घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.

Minor girl abused, exposed due to stomach ache

पाथर्डी:  पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील देवस्थानवर अनुष्ठानास बसलेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला चहासाठी घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने ४ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसा ठाण्यात मढी येथील राम कांता मरकड याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यांतील एक अल्पवयीन मुलगी मढी येथील कानिफनाथ देवस्थान येथे अनुष्ठानास बसली होती. या मुलीशी ओळख वाढवून राम मरकड हा तिला १५ एप्रिल रोजी त्याच्या घरी चहा पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला, तसेच याबाबत कुणाला सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान काही दिवसांनंतर पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी ही मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर तपास करीत आहेत.

Web Title: Minor girl abused, exposed due to stomach ache

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here