Home महाराष्ट्र मेडिकल विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये आत्महत्या

मेडिकल विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये आत्महत्या

Breaking News | Vardha Suicide: महाविद्यालयच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना.

Medical student's suicide

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. संबंधित तरुणी ही वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने शुक्रवारी (०१ ऑगस्ट) दुपारी आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिकणारी मृत तरुणी पूजा हिने याच महाविद्यालयच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कळताच तिच्या नागपूरस्थित पालकांनी महाविद्यालयात पोहचत संताप व्यक्त केला. आत्महत्येचे कारण अजून ही अस्पष्ट

संबंधित मुलीने आत्महत्या केल्यानंतर संतापाच्या भरात जमावकडून महाविद्यालय परिसरात तोडफोड करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित कुमार वाघमारे हे म्हणाले की आत्महत्येमागे काय कारण आहे हे पुढे आलेले नाही. मात्र, चौकशी केली जाईल. तसेच पोलीस यंत्रनेला सहकार्य करू, असे कुलगुरू म्हणाले. तर विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी पालकांचा संताप तूर्तास शांत झाला आहे. पण प्रकरण गंभीर व दुर्दैवी आहे. असे विद्यापीठात आजवर कधीच झाले नाही. आम्ही सर्व ती काळजी घेत असतो.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीची २ ऑगस्टपासून परीक्षा चालू होणार होती, तसेच ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये न राहता नागपूरातील आपल्या घरी राहून, अप-डाऊन करीत शिक्षण घेत होती. या संबधी विचारणा केली असता, मृत तरुणीवर उपचार सुरू होते. त्यासाठी तिला तिच्या घरी राहण्याची व घरून महाविद्यालायत येण्याची परवानगी देण्यात आली होती. नेहमीप्रमाणे ती गुरुवारी ड्राइव्हरसह स्वतःच्या गाडीने महाविद्यालयात पोहचली. ड्राइव्हर जेवायला गेला. तर ही महाविद्यालयात आली. त्यानंतर असे काय घडले की तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, हे कळायला मार्ग नसल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले.

Web Title: Medical student’s suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here