Home Accident News लग्न, शॉपिंगला गेले अन् वाटेत अनर्थ घडला, नवरदेवासह बहीण-भाचीचा दुर्दैवी अंत

लग्न, शॉपिंगला गेले अन् वाटेत अनर्थ घडला, नवरदेवासह बहीण-भाचीचा दुर्दैवी अंत

Breaking News | Beed Accident:  तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू.

Married, went shopping and mishap happened on the way, unfortunate end 

बीड: महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अंबाजोगाईजवळ वाघाळा पाटीजवळ रविवारी (३१ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला. या दुर्दैवी घटनेने जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा तालुका रेणापूर येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या तरुणाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल रविवार ३१ मार्च रोजी त्याची बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता.

लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला.

नातवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. अवघ्या महिनाभरावर लग्न राहिलं होतं आणि त्याचं घरात शोक पसरला आहे. हे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

चिमुकलीसह सख्खे-बहीण भाऊ हे लग्नाची तयारी करत असताना अशाप्रकारे अपघातात मृत्यूमुखी पडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Married, went shopping and mishap happened on the way, unfortunate end 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here