Home महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडका दिवाळीनंतरच….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडका दिवाळीनंतरच….

Breaking News | Maharashtra local body elections after Diwali without VVPAT : राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे.

Maharashtra local body elections after Diwali without VVPAT

elections after Diwali:  मनुष्यबळाची कमतरता असल्याने एकाच टप्प्यात निवडणुका न होता, टप्प्याटप्प्यानं होणार आहेत. मात्र आधी कोणती निवडणूक होईल हे अद्याप तरी निश्चित नाही. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायसमिती या सर्व निवडणुका जर एकत्रित घेतल्या गेल्या तर त्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नाही, त्यामुळेच या निवडणुका टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातील असं बोललं जात आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारपरिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत माहिती दिली. राज्यातील निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही, कारण प्रभाग पद्धती असल्याने एकपेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात, मतांची मोजणी करावी लागत असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकांमध्येही होणार नाही. जेव्हा एखाद्या निवडणुकीत एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दिवाळीनंतरच म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरपासून सुरुवात होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारेच पार पाडली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात मतदानयंत्राची कमतरता जाणवणार असल्याने, अन्य राज्यांमधून अतिरिक्त मतदानयंत्र मागवले जात आहेत.

Breaking News: Maharashtra local body elections after Diwali without VVPAT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here