Home महाराष्ट्र केशरीचे पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी आमिष, शरीरसुखाची मागणी करत विनयभंग

केशरीचे पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी आमिष, शरीरसुखाची मागणी करत विनयभंग

Breaking News | Palghar Crime: शरीर सुखाची मागणी करीत रेशनिंग दुकानदाराने विधवा महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार.

Lure to give orange yellow ration card, molest demanding physical pleasure

पालघर : शरीर सुखाची मागणी करीत रेशनिंग दुकानदाराने विधवा महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागझरी परिसरातील एका रेशनिंग दुकानदाराने विधवा महिलेला अधिकचे धान्य मिळण्यासाठी पिवळे रेशनकार्ड काढून देण्याचे आमिष दाखवत पालघरनंतर वडराई परिसरात नेऊन शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केला. पालघर तहसीलदार कार्यालयातील काम आटोपल्यानंतर विधवा महिलेला सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडराई भागात एका वाडीत नेऊन नेऊन शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोईसर मधील आदिवासी महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर घरकाम करून दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत आहे. माहेर नागझरी भागात असल्याने गावातील रेशनिंग दुकानात धान्य घेत होती. त्यामुळे स्थानिक रेशनिंग दुकानदारासोबत तिची ओळख झाली होती. ओळखीमुळे रेशनिंग दुकानदार दोन ते तीन दिवसातून तिला फोन करून विचारपूस करीत होता. जून महिन्याच्या अखेरीस तिला केशरी रेशनकार्ड पिवळे करून देण्याबाबत सांगितले. पिवळे रेशन कार्ड झाल्यानंतर अधिकचे धान्य मिळण्याच्या आशेने होकार देत कागदपत्रे गोळा केली.

मंगळवारी (दि.२३) रोजी रेशनिंग दुकानदाराने विधवा महिलेला त्याच्या कार मधून पालघरच्या तहसील कार्यालयात नेले आणि रेशनिंग कार्डसाठी लागणारी कागदपत्रे पुरवठा विभागात जमा केली. लवकरच पिवळे रेशन कार्ड मिळेल असे सांगत (दि.२३) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारने घरी जाण्यासाठी गाडीने निघाले असता रेशनिंग दुकानदाराने कार घराऐवजी वडराई येथील एका निर्जन ठिकाणी थांबवली. निर्जन ठिकाणी कार उभी केल्याबाबत विचारणा केली असता पाच मिनिटाचे काम असल्याचे सांगितले. परंतु काही वेळाने विधवा महिलेच्या अंगाशी चाळे सुरू केले, परंतु तिने नकार देत पालघर रेल्वे स्थानक परिसरात सोडण्याची विनंती केली. त्यानंतरही शारीरिक अश्लील चाळे करीत असल्याचा राग आल्याने भावाला फोन लावण्याची धमकी दिल्यानंतर रेशनिंग दुकानदार तिला पालघर स्टेशन परिसरात घेऊन आला. दरम्यानच्या प्रवासातही शरीर सुखाची मागणी केली. स्टेशन भागात पोहोचल्या नंतर दरवाजा तोडून बाहेर जाण्याचा इशारा दिल्यानंतर दुकानदाराने कारचे लॉक उघडले. या प्रकारामुळे विधवा महिला घाबरून गेली होती, बदनामीच्या भीतीने तिने कोणाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली नाही. परंतु रेशनिंग दुकानदाराच्या वागण्याचा मनात राग असल्याने भावाला माहिती दिली. त्यानंतर दोघांनी सातपाटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित महिलेच्या फिर्यादी नुसार सातपाटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि 75(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Lure to give orange yellow ration card, molest demanding physical pleasure

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here