संगमनेरमध्ये प्रतिबंधित ठिकाणी उघडली दारूची दुकाने, प्रशासनाची धावपळ
संगमनेर: लॉकडाऊन काळात संगमनेर शहरातील कॉलेज रस्ता, पुणे नाशिक महामार्ग, सय्यद बाबा चौक, कोल्हार घोटी राज्य महामार्ग या प्रतिबंधित केलेल्या ठिकाणी फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहतील असे प्रशासनाचे आदेश होते मात्र याच भागात मंगळवारी दारूची दुकाने उघडण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी असताना दारूची दुकाने उघडल्याने सर्वच नियम पायदळी तुडवीत दारू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दारूच्या दुकानासमोर रांगामुळे पोलिसांची व प्रशासनाची धावपळ उडाली. यांनतर मात्र प्रतिबंधित भागात असलेली दारूची दुकाने प्रशासनाने दुपारी एक वाजेच्या सुमारास बंद केली आहेत.
राज्यसरकारने महसूल मिळविण्यासाठी दारू विक्री सुरु केली मात्र यामुळे लॉकडाऊन अस्तित्वात राहील का याचा विचार मात्र केला गेला नाही. आज मंगळवारी संगमनेरमध्ये गर्दीच गर्दी आढळून आल्याने प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Website Title: Latest news Liquor shops opened at restricted places Sangamner Taluka