Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल !

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल !

Breaking News | Ahilyanagar Crime: मतिमंद अल्पवयीन मुलीचा नुकताच कॅडबरी आणि चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग.

Kopargaon Molestation of a minor girl

कोपरगाव: कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतिमंद अल्पवयीन मुलीचा नुकताच कॅडबरी आणि चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करून, नाव सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी, यातील आरोपी साईनाथ पगारे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजताच शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यातील आरोपी साईनाथ पगारे यास पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे. सदर अल्पवयीन मुलगी मतिमंद असल्याचे कळते. तिला धारणगाव रोडलगत असलेल्या पंपाजवळ असलेल्या उपनगराच्या काटवणात नेऊन, व एका शाळेजवळ घेऊन जाऊन तिच्याशी असभ्य वर्तन केले होते, व याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपी साईनाथ पगारे याने दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कारवाईबाबत शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईक महिलेने कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं. २६६/२०२५, भारतीय दंड संहिता सन -२०२३ चे कलम ७५ (१), ७८ (१), ३५१ (३) व सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे आदींनी भेट दिली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईक महिलेने कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं. २६६/२०२५, भारतीय दंड संहिता सन २०२३ चे कलम ७५(१), ७८(१), ३५१(३) व सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Kopargaon Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here