विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी कोपरगावच्या आरोपीस शिक्षा
औरंगाबाद | Aurangabad: दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीला विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार (sexually assaulting) करणारा नदीम अझीज शेख (वय १९ खाटिक गल्ली संजय नगर कोपरगाव) याला सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी या पोस्को कायद्याअंतर्गत २० वर्ष सश्रम कारावास आणि ४३ हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे.
कन्नड तालुक्यातील पिडीतीचे काकाने फिर्याद दिली होती. पिडीत मुलीची आई वारलेली असून तिचे वडील चालक असल्याने बाहेर असतात. त्यामुळे तिला कोपरगावात वसतिगृहात ठेवले होते.
नदीमने तिच्याशी ओळख वाढविली. तो नेहमी वसतिगृहात जाऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे कंटाळून वस्तीगृहाच्या रेक्टरने तिला तिच्या घरी पाठवून दिले. त्यानंतरही आरोपीने तिला वैजापूरला नेले. तिला वैजापुरात व तेथून येवला येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी देवगाव रंगारी ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल झाली होती. यामध्ये तक्रारदार, पिडीता, डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला दंड व शिक्षा ठरवली आहे.
Web Title: Kopargaon accused sentenced for sexually assaulting a girl student