कोकणगाव ग्रामपंचायत सरपंच लाच घेताना रंगेहाथ, दोघांना अटक
Ahmednagar News: कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना महिला सरपंचासह पतीला अटक.
श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतच्या ठेकेदाराने केलेल्या विविध कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या दहा टक्के प्रमाणे कमिशन म्हणुन 40 हजाराची लाच स्विकारताना सरपंच आणि त्यांचे पती यांना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.
सरपंच उज्वला सतिष रजपूत (32) व त्यांचे पती सतिष बबन रजपूत (42, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा ) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम अशा कामांचा 4 लाख 61 हजार 568 रूपयांचे कॉन्ट्रक्ट घेतले होते. त्यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केली. यानंतर त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच उज्वला सतिष रजपूत यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46 हजार रूपयांची लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे 10 जुलेै रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 10 जुलैे रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचेकडे 46 हजाराची लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. बिल जमा झाल्यानंतर आज गुरूवारी (दि.23) महिला सरपंच यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे सापळा लावण्यात आला.
सापळा कारवाई दरम्यान सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांच्या पतींनी कोकणगाव ग्रामपंचायत कार्यालयात सदर लाच रक्कम स्वीकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या पथकात लाचलुचपत पोलीस पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार, कर्मचारी रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर चालक दशरथ लाड आदींचा समावेश होता. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
Web Title: Kokangaon village panchayat sarpanch red-handed in taking bribe, two arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App