अहमदनगर: पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचे अपहरण
Breaking News | Ahmednagar: पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यासह पैसे दुप्पट करण्याच्या अमिशाला बळी पडणे व पाडणे दोन्हीकडील मंडळींना महागात पडले.
कोपरगाव : पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यासह पैसे दुप्पट करण्याच्या अमिशाला बळी पडणे व पाडणे दोन्हीकडील मंडळींना महागात पडले आहे. याप्रकरणी तब्बल ६ जणांना तरुंगाची हवा खावी लागणार आहे. याप्रकरणी जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलढाणा) पोलिसांकडून कोपरगाव पोलिसांकडे
कोपरगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुन्हा वर्ग झाला आहे. २२ जून रोजी अपहरणाच्या गुन्ह्यातून ही एक संपूर्ण सिनेस्टाईल घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील दिलीप भिकाजी इंगळे (४५, रा. इंदिरानगर, जानेफळ, जि. बुलढाणा) याने अमोल जयसिंग राजपूत (रा. जानेफळ) यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले.
पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दिलीप इंगळेसह अमोल जयसिंग राजपूत व इतर चार-पाचजण असे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात आले. आरोर्यांनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरुन त्याचे अपहरण करुन पांढऱ्या रंगाच्या ट्रिबेर कारमधून २२ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते कोकमठाण शिवारातून निघून गेले.
दरम्यान, याप्रकरणी पाऊस पाडणाऱ्याची पत्नी ज्योती दिलीप इंगळे (३५) हिने जानेफळ पोलिस स्टेशन (ता. मेहकर) येथे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कोपरगाव शहरचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व स. पोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Kidnapping of money maker
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study