स्टेट बँकेत नोकरीला लावून देतो म्हणत ५ लाखाला गंडा
कर्जत | Karjat: स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने ५ लाख रुपये घेऊन फसविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अमोल सुभाष चव्हाण रा, सावरगाव ता. जामखेड जिल्हा अहमदनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सुरेंद्र रामदास बनकर याची स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत शासकीय नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना २६ मे दरम्यान घडली आहे. या फिर्यादीवरून अमोल सुभाष चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तरुणांचे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सद्य परिस्थितीत एकाला पाच लाखाला तर एकाला चार लाखाला गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Karjat 5 lakh bribe saying he gets a job in State Bank