या तालुक्यात भरदिवसा दीड लाखाची घरफोडी
जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील मोहरी या गावात घरातील सर्व लोक शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील दीड लाख रुपये किमतीचे दागिने भरदिवसा लंपास केल्याची घटना घडली आहे.
ग्रामीण भागात शेतीचे कामे सुरु आहेत. शेतकरी ज्वारी काढण्याचे कामात व्यस्त आहेत. याचा संधीचा फायदा घेत तालुक्यातील मोहरी येथील शेतकरी चंद्रभान माणिक वाघमारे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची प्रकार घडला आहे. वाघमारे हे दि. २२ फेब्रुवारीला सकाळी घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासोबत शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात असलेल्या सामानाची उचकापाचक करून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १ लाख ५६ हजार रुपयांचा मुदेमाल लंपास केला आहे. या घटनेने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रभान वाघमारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Jamkhed One and a half lakh burglary in this taluka