अहिल्यानगर: पत्नी, नातेवाइकांकडून छळ, स्टेटस ठेवत पतीची आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: पत्नीच्या छळाला कंटाळून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
अहिल्यानगर : केडगाव परिसरात पत्नीच्या छळाला कंटाळून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना १० जुलै २०२५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. रोहन आबासाहेब कराड (वय २७, रा. शास्त्रीनगर, शनिमंदिराजवळ, केडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव दशरथ पाखरे, अजिनाथ महादेव पाखरे, दिलीप सूर्यभान खेडकर (तिघे रा. मढी, ता. पाथर्डी), विद्या रोहन कराड, राजू ऊर्फ राजेंद्र मुरलीधर दहीफळे, नीलेश राजेंद्र दहीफळे, मनीषा राजेंद्र दहीफळे (चौघे रा. चुंभळी, ता. पाथर्डी), श्रीधर कारभारी बुधवंत (रा. शहरापूर, ता. पाथर्डी), सुभाष सुखदेव पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी) असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयताचे वडील आबासाहेब कराड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा रोहन यांचे विद्या हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिने ती व्यवस्थित नांदली. त्यानंतर ती काहीएक कारण नसताना भांडण करत असे. फिर्यादीचा मुलगा तिला समजावून सांगत होता. तसेच तिला नांदायला येण्यासाठी फोन करायचा. परंतु इतर आरोपी तिला नांदायला पाठविण्यास नकार देऊन फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Breaking News: Husband commits suicide after being harassed by wife and relatives, keeping status