Home महाराष्ट्र Heat Wave: पुढील पाच दिवस सूर्य ओकणार आग, हवामान अंदाज  

Heat Wave: पुढील पाच दिवस सूर्य ओकणार आग, हवामान अंदाज  

 

Heat Wave next five days the sun will be on fire, weather forecast

Mumbai | मुंबई: राज्य उन्हाने होरपळू लागले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऱ्याने घाम फोडला आहे. बहुतांश शहरांचे कमाल तापमान चाळीशीपार नोंदविण्यात आले आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णता लाट (Heat Wave) येण्याची शकयता आहे.

मान्सूनच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या दक्षिणपूर्व उपसागरात आसानी चक्रीवादळ तयार झाले असून सोमवारी दुपारी ते आणखी तीव्र होईल. चक्रीवादळ गेल्या ६ तासांपासून ताशी १४ किमी वेगाने वायव्यच्या  दिशेने सरकत आहे. ते १० मे पर्यंत किनारपट्टीकडे सरकत पुढे येऊ शकते. १० मे रोजी सायंकाळपर्यंत ते उत्तर आंध्रप्रदेश व ओडीसा किनारपट्टीलगत आल्यानंतर ते किनारपट्टीपासून काहीसे दूर इशान्य पूर्वेकडे वळण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज: ९ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

१० ते १२ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाउस पडेल, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट.

Web Title: Heat Wave next five days the sun will be on fire, weather forecast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here