Home अहमदनगर अहमदनगर: कोरोनाचे जिल्ह्यात थैमान, पालकमंत्री गायब

अहमदनगर: कोरोनाचे जिल्ह्यात थैमान, पालकमंत्री गायब

Guardian Minister missing in Ahmednagar corona

अहमदनगर: जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन पुरवठा होत नाही.

रेमडेसिवीरचा काळा बाजार होताना दिसत आहे. रेमडेसिवीरचा ससेहोलपट होत असताना प्रशासकीय पातळीवर महत्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब असल्याचे दिसत आहे. निवडणुकीत व्यस्त असणाऱ्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळ नसेल तर अन्य मंत्र्याकडे जबाबदारी देण्याची मागणी जिल्हा परिषद पंचशिला गिरमकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोना चाचण्या सुरु आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदे असतानाही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढत आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Guardian Minister missing in Ahmednagar corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here