Accident: कारचा भीषण अपघात, चार तरुण जागीच ठार
Gondia Car Accident: कार अचानकअनियंत्रित झाल्याने गाडी रस्त्याच्या खाली आपटून अपघात, चार ठार एक जखमी.
गोंदिया: गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ रात्री कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील हे चारही तरुण आहेत.
रामकृष्ण बिसेन (वय २४), सचिन कटरे (वय २४), संदीप सोनवाने (वय १८) व निलेश तुरकर (वय २७) यांचा मृत्यू झाला तर प्रदीप बिसेन (वय २४) हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. सोलर फिटींगचे कामे आठोपुन हे पाचही तरुण रात्री परत येत होते. दरम्यान अचानक गाडी अनियंत्रित झाल्याने गाडी रस्त्याच्या खाली आपटुन चकनाचूर झाली. (Accident) यामध्ये पाच तरुणांपैकी चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Web Title: Gondia Car Accident four death one injured