Home चंद्रपूर युवतीचा वाढदिवस असल्याने तो रूमवर गेला अन तिथे तिसऱ्यांलाच बघून घडलं भलतच

युवतीचा वाढदिवस असल्याने तो रूमवर गेला अन तिथे तिसऱ्यांलाच बघून घडलं भलतच

Breaking News | Vardha Crime: प्रेम प्रकरणातून (love) एक युवकाचा खून आणि युवतीला गंभीर जखमी केल्याची घटना.

girl's birthday, he went to the room and saw only the third person there

वर्धा: वर्ध्यात प्रेम प्रकरणातून एक युवकाचा खून आणि युवतीला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयताचे नाव मोहित मोहुर्ले असून आरोपीचे नाव प्रवीण सोनटक्के आहे. हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सदर घटना वर्ध्यात खळबळ उडवणार आहे आणि पोलिस तपास सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, युवतीचा वाढदिवस असल्याने आरोपी प्रवीण सोनटक्के वर्ध्यात आला होता. त्याने युवतीला फोन केला असता, तिने फोन उचलला नाही. त्यामुळे आरोपी युवतीच्या रूमवर गेला असता, तिथे त्याला मोहित मोहुर्ले हार्दिक दिसला. हा प्रसंग पाहून प्रवीणचा राग अनावर झाला.

आरोपीने लोखंडी रॉडने मोहित आणि युवतीवर हल्ला केला. यात मोहितचा जागीच मृत्यू झाला, तर युवती गंभीर जखमी झाली. सध्या युवतीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी आणि मृतक चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणीच्या गावातील आहेत. मृतक मोहित तरुणीचा मामे भाऊ असल्याची माहिती आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

युवतीची सावंगी येथे नर्सिंगच्या एएनएमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. साई पार्क परिसरातील भाड्याच्या घरात ती राहत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी प्रवीण सोनटक्के याला ताब्यात घेतले आहे. हत्येचा थरार मध्यरात्री घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: girl’s birthday, he went to the room and saw only the third person there

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here