युवकानं विनयभंग केल्यामुळं मुलीनं विष पिऊन केली आत्महत्या
Breaking News | Young Women Suicide: युवकाने मुलीवर अत्याचार केल्यामुळे तिने विष पिऊन आत्महत्या केली.
वाशिम: महाराष्ट्रातून एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विदर्भात एका मुलीसोबत विनयभंगाचे प्रकरण समोर आलं आहे. वाशीम येथील एक मुलगी एकटी होती, संधी बघून एका व्यक्तींन घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या युवकाने मुलीवर अत्याचार केल्यामुळे तिने विष पिऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून मुलीने आत्महत्या केल्यामुळे हाहाकार उडाला आहे.
आरोपी झाला गायब
आरोपी ही घटना घडल्यानंतर गायब झाला आहे. त्याचा पोलीस तपास करत असून पुराव्याच्या आधारे त्याचा शोध घेतला आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेमुळे तालुका परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरण मान्य नव्हते म्हणून मुलीच्या रूममध्ये घुसून तिच्यासोबत बळजबरीने सेल्फी घेतला जातो आणि ती स्वतः आत्महत्या करते हे खूप दुर्दैवी घटना आहे.
आरोपीचे कुटुंबीय घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. मुलीला आरोपी माझ्याशी लग्न कर, असा कायमच तगादा लावत होता. त्यामुळे मुलीने कंटाळून आत्महत्या केली आहे. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने आत्महत्या केली आहे. आरोपीचा तपास हा पुराव्यांच्या मदतीने घेतला जात असून लवकरच पोलिसांच्या हाती तो लागेल अशी शक्यता वर्तवली हात आहे.
Breaking News: Girl commits suicide by consuming poison after being molested by a young man