अहमदनगर: साहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चौघे निलंबित
Ahmednagar News | Sonai: मनोज पाटील यांनी ही कारवाई केली (suspended).
अहमदनगर: पोलीस ठाण्यात युवकास आहे. मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पंतगे, साहाय्यक फौजदार संजय बाबूराव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक
सोनई पोलीस ठाण्यात राजेंद्र रायभान मोहिते (रा. गणेशवाडी, ता. नेवासा) या युवकास समज देण्याच्या नावाखाली पोलीस ठाण्यात आणून मारहाण केल्याची घटना घडली होती. युवकास बेकायदेशीरपणे मारहाण करण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युवकांच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी दोषी आढळून आले. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता युवकास पोलीस ठाण्यात आणून अमानुषपणे मारहाण केल्याचे उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
युवकास मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलीस अधिकारी व कर्मचारी दोषी आढळून आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. -मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
Web Title: Four suspended including Assistant Police Inspector