अहमदनगर: मुलींची छेड काढणाऱ्या शिक्षकास सक्तमजुरी
Breaking News | Ahmednagar: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दि. १८ एप्रिल रोजी दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.
राहुरी : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अहमदनगर येथील न्यायालयाने दि. १८ एप्रिल रोजी दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की पीडीत मुली राहुरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या. आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास होता. मदन दिवे याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. या घटनेची माहिती मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापिकेस लेखी स्वरुपात दिली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांच्या समोर चालला. या खटल्यामध्ये एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दि. १८ एप्रिल २०२४ रोजी या खटल्यात आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर) यास न्यायाधीश श्रीमती सहारे यांनी दोषी धरून त्यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजार रुपए दंड व दंड न भरल्यास
लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपए दंड व दंड न भरल्यास २ महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. फिर्यादी, पिडीत दोन मुली, मुख्याध्यापिका, शिक्षक व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निरंज जयंत बोकिल यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता मंगेश व्ही. दिवाणे यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी भक्कम स्वरूपाचा पुरावा सादर केला व युक्तीवाद केला. त्यांना पोलिस हवालदार अविनाश दुधाडे, योगेश वाघ, सहाय्यक फौजदार विलास साठे, महिला पोलिस राणी बोर्डे यांनी सहकार्य केले.
Web Title: Forced labor for teachers who molest girls
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study