Home संगमनेर संगमनेर: तुकडा बंदी आदेशाचा भंग, महसूलचे पाच कर्मचारी निलंबित

संगमनेर: तुकडा बंदी आदेशाचा भंग, महसूलचे पाच कर्मचारी निलंबित

Breaking News | Sangamner: एक मंडळ अधिकारी, तीन तलाठी व अन्य १ मंडळ अधिकार अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई.

Five revenue employees suspended for violating ban on tukkah

संगमनेर: शासनाने तुकडा बंदी केलेली असताना देखील ग्रीन झोन आणि यलो झोनमध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी बेकायदा या भागांमध्ये तुकडे पाडून त्याचे स्वतंत्र सातबारे तयार केले. या विरोधात एक व्यक्ती उपोषणास बसला होता, त्याने प्रांत आणि तहसिल यांच्याकडे न्याय मागितला पण त्यास न्याय मिळाला नाही, त्यानंतर या व्यक्तीने विभागीय आयुक्तांपर्यंत अपिल केले होते, प्रदिर्घ कालखंडानंतर यावर निर्णय झाला. यात एक मंडळ अधिकारी, तीन तलाठी व अन्य १ मंडळ अधिकार अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे महसुल विभागात एकच खळबळ उडाली.

अधिनियम १९४७ नुसार तुकडाबंदी कायदा, ज्यात महाराष्ट्र

जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यात आला होता, जमिनीचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करण्यास मनाई करण्याबाबत हा कायदा आहे. याचा उद्देश जमिनीचे मोठे तुकडे टिकवून ठेवणे आणि त्यांचे एकत्रीकरण करुन ठेवणे हा आहे. त्यामुळे शासनाने रेड झोन, यलो झोन आणि ग्रीन झोन असे जमिनींचे विभाजन करुन त्यानुसार त्यांच्या विभाजनावर नियम व अटी लागू केल्या होत्या. मात्र, हे सर्व नियम ढाब्यावर बसवून या नियमांचे उल्लंघन करुन रहिवासी प्रयोजन, प्रादेशिक विकास आराखडा तसेच ग्रीन झोनमध्ये जमिनीचे तुकडे केले, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रेखांकन केले नाही, मंजुरी न घेता जमिनींची तुकडे केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

Breaking News: Five revenue employees suspended for violating ban on tukkah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here