नववीतील मुलाचे थरारक कृत्य, रागात आईलाच संपवले
Akola Crime News: वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईचा कट रचला अन् तिचा दगडानं ठेचून खून (Murder) केल्याची घटना.
अकोला: जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका 40 वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केला. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा हात असल्याचं समोर आले आहे. या हत्या प्रकरणात हत्येचं मूळ कारण म्हणजेच खळबळजनक माहिती देखील समोर आली. मुलांनं पोलिसांना सांगितले की, त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. 4 जूनला दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईचा कट रचला अन् तिचा दगडानं ठेचून खून केला. संगीता राजू रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असं या मृत महिलेचं नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दहीगाव गावंडे येथील मृतक संगीता राजु रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे) हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे इथे राहत होती. रविवार म्हणजे ४ जूनपासून संगिता ही गावातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याच समोर आलं होतंय. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हत्याचा तपास अकोला पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. संगीता हिच्याच पंधरा वर्षे वयाच्या मुलानं तिची (आईची) हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव यांनी केला आहे.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. रागवायचं कारण म्हटल्या गेलं तर मारेकरी मुलांना शिक्षण सोडून दिलं, म्हणजेच शाळेत जाणे बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं. अधिक तपास बोरगाव मंजू पोलिस स्टेशन संजय खंदाडे हे करीत आहे.
Web Title: fit of rage, the mother hatched a conspiracy and Murder her by crushing her with a stone
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App