गोळीबार, २८ वर्षीय तरुण जागीच ठार
Dharashiv Firing: सावत्र बहिणीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातील साक्षीदार असलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर गावठी कट्टातून गोळीबार.
धाराशिव: सावत्र बहिणीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातील साक्षीदार असलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर गावठी कट्टातून गोळीबार करण्यात आला. लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन गोळ्या लागल्याने तो जागीच ठार झाला. पोलिसांनी सांगितले, लोहारा
तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील रावण रसाळ व त्याची बहीण या दोघांमध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. या कौटुंबिक भांडणात गावातीलच नितीन आरगडे हा साक्षीदार होता. त्यामुळे रावण रसाळ याच्या मनात साक्षीदार आरगडे यांच्याविषयी राग होता. याच रागातून गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रावण हा नितीनच्या शोधात त्याच्या शेतात पोहोचला.
Web Title: Firing, 28-year-old youth killed on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News