भास्करराव पेरे पाटील यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील मोहा येथील कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील यांनी पत्रकारांविषयी आक्षेपार्हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फिर्याद दिली आहे.
मोहा येथील एका कार्यक्रमात ३१ जानेवारी रोजी त्यांनी भाषण केले असून या भाषणात त्यांनी पत्रकारांना हलकट, हरामखोर असे शब्द वापरले. त्यामुळे जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा निषेध केला होता. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
आज अखेर आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच भास्कराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: Finally a case was filed against Bhaskarrao Pere Patil