खळबळजनक! महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्येच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार
Breaking News | Nashik Crime: महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार (Raped).
नाशिक : नाशिक:नाशिकमधून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामध्ये नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित असे संशियीत आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथंच असा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्यानं आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशियत आरोपीकडून मारहाण करण्यात आली. यानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपीने बलात्कार आणि मारहाणीनंतर पीडित महिलेचे व्हिडिओदेखील काढले.
Web Title: female police officer was raped in the Maharashtra Police Academy
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study