धक्कादायक! सहकारी हवालदारानेच केला महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग
मुंबई: मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाने विनयभंग (Molested) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सॲपवर हेतू पुरस्सर मेसेज पाठवत होता. इतकचं काय तर महिला अधिकाऱ्याचा पाठलागही करत असे. दरम्यान ८ एप्रिलला आरोपी शिपायाने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजल मेसेज पाठवला.
सहकारी पोलिस शिपायाच्या दिवसें-दिवस वाढत असलेल्या या त्रासाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने संबधित सहकारी पोलिस हवालदाराविरोधात खार पोलिस ठाण्यात ३५४(ड), ५०९, भा.द.वि सह ६७ माहिती तंत्रज्ञान ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला असुरक्षित असल्याची टीका होत या घटनेमुळे पोलिस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
Web Title: female police officer was molested by a fellow constable