Home महाराष्ट्र तरुणीवर गुंगीचे इंजेक्शन देऊन डॉक्टरचा अत्याचार ! वैद्यकीय सेवेला काळिमा

तरुणीवर गुंगीचे इंजेक्शन देऊन डॉक्टरचा अत्याचार ! वैद्यकीय सेवेला काळिमा

Breaking News | Tuljapur Crime: उपचारासाठी आलेल्या तरुणीस गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तसेच माया व्हिडिओ बनवूर ब्लैकमेल केल्याची घटना.

doctor abused a young woman by injecting her with gunge

तुळजापूर: उपचारासाठी आलेल्या तरुणीस गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तसेच माया व्हिडिओ बनवूर ब्लैकमेल केल्याची घटना समीर आली आहे. वैद्यकीय सेवेल्ड कालिमा पिाडिओ सदर महिलेस दाखवत तो मीडियावर टाकून बदनामी करण्याची व ठार मारण्याची धमकी दिली. अखेर घडला प्रकार तरुणीने कुटुंबीयांना सांगून शुक्रवार (दि.१) रोजी तुळजापूर पोलीस ठाणे गाठत डॉक्टरविरोधात फिर्याद दिली,

 तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तुळगापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ओम साई फिलनिक येथील डॉ. रमेश राजेंद्र लबडे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील सहा महिन्यांपूर्वी पिडीत तरुणीस सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने ती आपल्या आईसोबत डॉ. रमेश लबडे याच्या

ओमसाई क्लिनिक येथे तपासणीला गेली होती. यावेळी डॉक्टरांनी रक्ताची चाचणी करून सहा इंजेक्शनचा कोर्स करावा लागेल, असे सांगून दर दोन दिवसांनी येण्यास सांगितले. यावेळी आईसोबत सदरील तरुणी इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यात जात होती. पहिले दोन वेळेस डॉक्टरने आईला इंजेक्शन घेतेवेळी पीडितेसोबत आतमध्ये येण्यास परवानगी दिली. परंतु तिसऱ्या वेळेस कंपाऊंडरने आईला बाहेरच थांबवत फक्त तरुणीस आतमध्ये बोलावले. यावेळी इंजेक्शन दिल्यानंतर तरुणीस गुंगी आल्यावर डॉक्टरने तिच्यावर अत्याचार करत याचा व्हिडिओ बनवला. यावेळी पीडितेने गुंगी येत असल्याबाबत विचारल्यानंतर अॅलर्जी नीट होण्यासाठी इंजेक्शन असल्याने असे होते, असे सांगितले. मात्र, शेवटचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १६ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित तरुणी कॉलेजमध्ये असताना डॉक्टरने तिला फोन करत नवीन बसस्थानक तुळजापूर येथे बोलावून घेतले. तेथून वाहन क्रमांक एमएच २५ एएस ५०५१ यातून तरुणीला शहरातीलच पुष्पविहार लॉज येथे नेऊन तिथे रिव्हॉल्व्हर दाखवून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडिओ दाखवत तो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची व ठार मारण्याची धमकी दिली. अखेर घडला प्रकार तरुणीने कुटुंबीयांना सांगून १ नोव्हेबर रोजी तुळजापूर पोलीस ठाणे गाठत डॉक्टरविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार डॉक्टरविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: doctor abused a young woman by injecting her with gunge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here