Home अहमदनगर अहमदनगर: प्लास्टिकच्या टिपाडात आढळला मृतदेह हातपाय बांधलेले, वार केलेले

अहमदनगर: प्लास्टिकच्या टिपाडात आढळला मृतदेह हातपाय बांधलेले, वार केलेले

Breaking News | Ahmednagar: १०० लिटरच्या प्लास्टिकच्या टिपाडात अंदाजे ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. शरीरावर अनेक प्राणघातक वार केल्याचे समोर.

Dead body was found in a plastic bag with hands and feet tied

राहुरी : एका १०० लिटरच्या प्लास्टिकच्या टिपाडात अंदाजे ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. ही घटना बारागाव नांदूर परिसरात डावा कालव्याच्या बाजूला देवकर वस्तीवर येथे समोर आली.

मुळा धरणातून येणाऱ्या डाव्या कालव्यालगत आज सकाळी साडेसातच्या सुमारास बारागाव नांदूर परिसरातील एक व्यक्ती कालव्याच्या कडेने जात असताना त्याला उग्र वास आला. वासाच्या दिशेने त्याने शोध घेतला असता, कालव्याच्या कडेला झुडपात एका शंभर लीटरच्या टिपाडात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्या व्यक्तीने घटनेची माहीती जि. प. सदस्य धनराज गाडे यांना मोबाइलवरून दिली. गाडे यांनी पोलिस प्रशासनाला महिती दिली.

त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलूबर्मे, उपविभागीय पो. आधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पो.नि. संजय ठेंगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका प्लास्टिक टिपाडामध्ये अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या शरीरावर अनेक प्राणघातक वार केल्याचे समोर आले. नगर येथील श्वान पथकाने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारपर्यंत त्यात यश आले नव्हते.

Web Title: Dead body was found in a plastic bag with hands and feet tied

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here