Home अहमदनगर महिलेचा  मृतदेह विहिरीत आढळला, आत्महत्या की घातपात..?

महिलेचा  मृतदेह विहिरीत आढळला, आत्महत्या की घातपात..?

Breaking News | Ahmednagar: ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead body) विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला.

Dead body of woman found in well, suicide or accident

राहुरी: तालुक्यातील गडाखवाडी येथे ८ एप्रिल रोजी सकाळी ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. दरम्यान, मृत वृद्धेच्या अंगावर रे जखमा दिसल्याने खळबळ उडाली न आहे. नानुबाई शिवराम गागरे (८५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. न तालुक्यातील गडाखवाडी परिसरात व त्या राहत होत्या. त्यांच्या घरापासून न काही अंतरावर विहीर आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता परिसरातील एका तरुणाने विहिरीत – पाण्यावर तरंगताना वृद्धेचा मृतदेह पाहिला. थोड्याच वेळात परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गडाखवाडीचे उपसरपंच बापू जगताप, पप्पू माळवदे, अरुण गागरे, सोमा गागरे, महेश हारदे, बाळू नाणेकर, रायभान वाबळे, प्रकाश बेलकर, सचिन गागरे आदी तरुणांनी मदत कार्य केले.

काही तरुणांनी विहिरीत उतरुन मृतदेह बाजेवर ठेवून विहिरीतून बाहेर काढला. रवींद्र देवगीरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी येथे ग्रामीण रुग्णालयात नेला. वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, नानुबाई गागरे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली की, त्यांचा घातपात झाला. याबाबत तपास राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व पोलिस हेडकॉन्स्टेबल ह. जानकिराम खेमनर करीत आहेत.

Web Title: Dead body of woman found in well, suicide or accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here