अहमदनगर: मृतदेह थेट पोलीस ठाण्यातच…..
Breaking News | Ahmednagar: रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये आढळल्याने खळबळ.
राहुरी : तालुक्यातील रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संतप्त नातवायिकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेवून, अंत्यविधी करण्यात आला. चांद आंबीर पठाण (४५, रा. रेल्वे स्टेशन, ता. राहुरी) असे मृत इसमाचे नाव आहे. निलेश तनपुरे यांच्या विट भट्टीवर तो कामाला होता. २ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारील काही लोकांशी पठाण यांचा वाद झाला होता. दुपारी ३ वाजता एक महिलेसह पुरूष पठाण यांच्या घरी आला. तुझे वडिल बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांनी मुलाला सांगितले. चांद पठाण यांचा मुलगा शकिल पठाण याने रेल्वे स्टेशन हद्दीत मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात
जावून पाहिले असता त्याला चांद पठाण यांचा मृतदेह आढळला. ही माहिती देताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगेंसह स.पो. नि. रविंद्र पिंगळे, स. फौ. तुळशिराम गिते, पो. हवालदार सूरज गायकवाड, संदीप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे आदींनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी तो अ. नगर येथे सिव्हील रुग्णालयात पाठविला, मात्र मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने नातेवाईकांनी चांद पठाण यांची हत्या झाल्याचा दावा केला. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पावित्रा नातेवायिकांनी घेतला होता.
३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता पठाण यांच्या नातेवायिकांनी मृतदेहासह पोलिस ठाणे गाठून ठिय्या मांडला. यावेळी पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी पठाण खूनप्रकरणी वैद्यकीय अहवालासह पोलिस तपास प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अहवाल येताच गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर नातवायिकांनी आंदोलन मागे घेवून अंत्यविधी केला.
Web Title: dead body directly in the police station
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study