तलावात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, सेल्फी काढण्याच्या नादात
सेल्फी काढण्याच्या नादात तलावात बुडून चौघांचा मृत्यू.
नागभीड | चंद्रपूर: रविवारी घोडाझरी तलावात बुडालेल्या चारही तरुणांचे शोधण्यात पथकाला सोमवारी यश आले आहे. तब्बल आठ तासांच्या परिश्रमानंतर एका मृतदेहाचा शोध लागला. उर्वरित तीनही मृतदेह मिळाल्यानंतर सर्व चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. रविवारी दुपारी वरोरा तालुक्यातील आठ युवक नागभीड तालुक्यातील घोडाझरी मृतदेह तलावावर पर्यटनासाठी आले होते. सेल्फी काढण्याच्या नादात चेतन भीमराव मांदाडे (वय १७) याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी संकेत प्रशांत मोडक (२२), नंतर धीरज गजानन झाडे (२७) आणि मनीष भारत श्रीरामे (३०) हेही पाण्यात बुडाले.
Web Title: Dead Bodies of four drowned in the lake were found
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App