टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
Palghar Accident: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू.
पालघर: पालघर येथील चारोटी येथील ब्रिजवर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या खळबळजनक बातमीने सर्वानाच शोक बसला आहे.
मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर सायरस मिस्त्री यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात इतर दोन जणांचाही मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी संगितले आहे. सायरस मिस्त्री २०१९ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Web Title: Cyrus Mistry died in car accident