मालकाने पगार न दिल्याच्या रागातून डेअरी कार्यालयास लावली आग, लाखोंचे नुकसान
कर्जत | Crime News: कर्जत तालुक्यातील राशीन येथे अजब प्रकार घडला आहे. एका दुध डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्याने डेअरी कार्यालयास आग लावल्याची घटना घडली आहे.
दुध डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून गणेशवाडी येथे खासगी डेअरी मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी राहुल मोरे याने त्याच्या मालकाच्या दुध डेअरी प्लांट कार्यालय, स्टोअर रूम, जनरेटर रूमला आग लावली. यामध्ये सुमारे सात लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
याप्रकरणी राहुल मोरे विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी राहुल मोरे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Crime News set fire to the dairy office out of anger for not paying the salary