Home अहमदनगर Crime News: दुकान मालकाकडून गिऱ्हाईकास ६ लाखास गंडा

Crime News: दुकान मालकाकडून गिऱ्हाईकास ६ लाखास गंडा

Crime News 6 lakh from shop owner to shopkeeper

कर्जत |Crime News | Karjat: कर्जत येथे खडी फोडण्याची मशीन विकत घेण्यासाठी सहालाख रुपये दुकानदार मालकास पाठविले. मात्र मशिनही दिले नाही आणि पैसेही परत केले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकान मालकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  देवीदास भिवा खरात, वय ५०, रा. कर्जत यांनी खडी फोडण्याची विकत घेण्यासाठी नंदिनी इंजिनिअरींगच्या कोटेशनवर दिलेल्या अकाऊंटवर  सहा लाख रुपये आरटीजीएस करून पाठविले. त्यांनी दुकान मालक विजय देवराम पवार, रा. नाशिक याला फोन करून पैसे पाठविले असल्याचे सांगितले. त्यांनीही पैसे आल्याचे सांगितले. मात्र विजय पवार यांनी मशीनही नाही दिली आणि पैसे पण परत केले नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच  खरात यांनी कर्जत पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध कलम ४०६, २० प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार शेख हे करत आहेत.

Web Title: Crime News 6 lakh from shop owner to shopkeeper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here