Crime: अहमदनगर: माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा
Ahmednagar Crime |अहमदनगर: अल्पवयीन मुलीची छेड काढली असे म्हणत मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर व राहुल जाधव (दोघे रा. गंगा उद्यान परिसर) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष चित्तरंजन शिंदे या युवकाने फिर्याद दिली आहे. मुलीची छेड काढल्याप्रकरणी शिंदे याच्यावर मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी परस्परविरोधी विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे हा युवक हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिथे बोरकर व जाधव हे दोघे आले. त्यांनी मुलीची छेड का काढतोस असे म्हणत शिंदे याच्यावर मुलीची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime against five people, including a former corporate