चुलत्याने केला सात वर्षीय पुतणीवर अत्याचार
Ahmednagar: अहमदनगर शहरातून धक्कादायक फासणारी घटना समोर आली आहे. चुलत चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार.
अहमदनगर: चुलत चुलत्याने अल्पवयीन (वय 7) पुतणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलत दीर, त्याची पत्नी व मुलगी यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 जून, 2022 रोजी रात्री ही घटना घडली असून सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहत असलेल्या वाड्यात शेजारी त्यांचा चुलत दीर राहतो. 20 जून रोजी रात्री फिर्यादी यांची मुलगी खेळण्यासाठी घरातून बाहेर गेली होती. ती सव्वा आठ वाजले तरी घरी न आल्याने फिर्यादी तिला पाहण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी न दिसल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या कक्षेबाहेर वाड्याच्या पहिला मजल्यावरील बाजुच्या पॅसेजमध्ये पाहिले असता, चुलत दीर याने मुलीला मांडीवर घेवून तिच्याशी गैरवर्तन करत अत्याचार केल्याची बाब दिसली.
दरम्यान फिर्यादी तत्काळ मुलीजवळ गेल्या असता मुलगी खूप घाबरलेली असल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी पतीला बोलून घेतले. त्यांनी घडल्या प्रकाराबाबत दीराकडे विचारणा केली असता त्याने, त्यांची पत्नी व मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास विरोध केला. आरोपी चार महिने घर सोडून दुसरीकडे राहण्यास केला होता. दिवाळी सणानिमित्त तो घरी आला होता. त्याच्यासह पत्नी व मुलीने फिर्यादीच्या मुलीला 20 जून, 2022 रोजी घडलेल्या घटनेबाबत कोठेही वाच्यता करू नको, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.
Web Title: Cousin molested seven-year-old nephew
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App