संगमनेर तालुक्यात करोनाचा हाहाकार एकाच दिवशी ८४ रुग्ण
Coronavirus | संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाने अक्षरशः हाहाकार घातला आहे. बुधवारी सकाळी १९ नंतर सायंकाळी ४३ तर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात २२ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १५१५ इतकी झाली आहे.
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात २२ करोनाबाधित आढळून आले यामध्ये गिरीराज विहार कॉलनी ६४ वर्षीय व्यक्ती, वकील कॉलनीत ५४ वर्षीय व्यक्ती, नेहरू चौक ४८ वर्षीय व्यक्ती, रेहमतनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, इंदिरानगर ५२ वर्षीय महिला, ४६ व ४१ वर्षीय व्यक्ती, स्वामी समर्थ नगरमधील ६९ व ६८ वर्षीय वृद्ध, ६० वर्षीय महिला, गणेश विहार कॉलनीत ५६ वर्षीय पुरुष, श्रीराम कॉलनीत ५७ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, नवीन नगर रोड ५६ वर्षीय पुरुष, तर तालुक्यात गुंजाळवाडी येथे २७ वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथे ७२ वर्षीय जेष्ठ नागरिक, घुलेवाडी येथे ६९ वर्षीय महिला, ५५ व ३० वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ३५ वर्षीय महिला, साकुर येथे ४१ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ३२ वर्षीय तरुण असे २२ रुग्ण आढळून आल्याने काल दिवसभरात ८४ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title: Coronavirus Sangamner taluka one day 84 patient