Coronavirus: अकोले तालुक्यात आज ०७ व्यक्ती कोरोना बाधित
Coronavirus Akole taluka Seven infected today
अकोले | Coronavirus: शहर निरंक तर तालुक्यातील लहीत ०३ , इंदोरी ०२, चास ०१, कोतुळ ०१ व्यक्ती कोरोना पॅाझिटीव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३५८ झाली आहे.
आज शुक्रवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या ४५ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधील अहवालात तालुक्यातील लहीत येथील ७३ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महीला, इंदोरी येथील ४५ वर्षीय महीला, २२ वर्षीय महीला, चास येथील २५ वर्षीय पुरुष, कोतुळ येथील १८ वर्षीय युवती अशा सात व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३५८ झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर ०९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे त्यापैकी ४७ व्यक्ती खानापुर कोविड सेंटर येथे तर ५७ व्यक्ती खाजगी रूग्णालयात व जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूचा दर २.५१ टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण ७०.२० टक्के आहे.
Web Title: Coronavirus Akole taluka Seven infected today