Home अहमदनगर अहमदनगर: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, गुन्हा दाखल  

अहमदनगर: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, गुन्हा दाखल  

Breaking News | Ahmednagar Crime: ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण.

Controversial posts on social media about Pankaja Munde crime filed

पाथर्डी : ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने बुधवारी (दि. ५) रात्री तालुक्यातील शिरापूर गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी शुक्रवारी (दि. ७) पाथर्डी बंदची हाक दिली.

शिरापूर येथील तरुण महेश दत्तात्रय शिंदे याने पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने संतप्त झालेले शेकडो युवक बुधवारी रात्री पाथर्डी पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलिस निरीक्षक

संतोष मुटकुळे यांच्याकडे केली. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व युवक शिरापूर येथे गेले. ते युवक शिरापूरला गेल्याचे समजताच पोलिसही गावात गेले. वादग्रस्त पोस्ट ठेवल्याच्या निषेधार्थ अमोल गर्ने, मुकुंद गर्जे, रणजित बेळगे, अर्जुन घायतडक, अक्षय शिरसाट, अॅड. विठ्ठल बडे, भाऊसाहेब शिरसाट, संदीप आव्हाड, संजय शिरसाट, अशोक दहिफळे, सचिन शिरसाट, कानिफ आंधळे, दत्ता गीते, जनार्धन शिरसाट आदींनी पोलिसांना निवेदन दिले. याप्रकरणी महेश शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Controversial posts on social media about Pankaja Munde crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here