सिन्नर शहरातील कॉफी शॉप पोलिसांकडून उध्वस्त, शाळकरी मुला मुलींना प्रायव्हसी, अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन
Nashik Crime : कॉफी शॉपच्या नावाखाली सिन्नर शहरात सुरू असलेले तरुण तरुणींच्या अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणारे अड्डे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उध्वस्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे.
सिन्नर: कॉफी शॉपच्या नावाखाली सिन्नर शहरात सुरू असलेले तरुण तरुणींच्या अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणारे अड्डे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उध्वस्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे.
सिन्नर बस स्थानक परिसरात तसेच शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये असलेल्या या कॉफी शॉप मध्ये प्रेमी युगुल , महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व अल्पवयीन शाळकरी मुला मुलींना प्रायव्हसी उपलब्ध करून देत असत सुज्ञान नागरिकांनी तक्रार केली होती.
कॉफी विक्री अथवा कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य या ठिकाणी आढळून न आल्याने पोलीस पथकाने प्रेमी युगुलांचे हे अड्डे अक्षरशः तोडफोड करून उध्वस्त केले.
सिन्नर शहरातील आठवण कॅफे, व्हाट्सअप कॅफे, रिलॅक्स कॅफे, हर्टबिट कॅफे या नावाने सुरू असलेल्या कॉफी शॉप मध्ये मुला मुलींच्या अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारी शहरातील सुजाण नागरिकांकडून पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या.
स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते.
त्यानुसार विशेष पोलीस पथकाने वरील कॉफी शॉपची तपासणी केली असता त्या ठिकाणी सुरू असलेला अश्लील चाळयांचा उद्योग उघडकीस आला.
या कॉफी शॉप मध्ये कॉफी बनवण्याचे कुठलेही साहित्य आढळून आले नाही किंवा कॉफी विक्री केली जात असल्याचेही निष्पन्न झाले नाही.
महाविद्यालयीन व त्यात अल्पवयीनांचा समावेश असलेल्या प्रेमी युगुलांना तासाभरासाठी ठराविक रक्कम आकारून या ठिकाणी एकांतपणा उपलब्ध करून दिला जात असे.
पोलिसांनी तपासणी केली तेव्हा अनेक अल्पवयीन न मुले मुली बिंदासपणे एकमेकांच्या बहुपाशात असल्याचे देखिल आढळून आले. चार बाय चार फूट आकाराच्या केबिन्समध्ये येणाऱ्या जोडप्यांना प्रायव्हसी उपलब्ध करून दिली जायची. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक दीपक अहिरे, शांताराम नाठे, विनोद टिळे, गिरीश बागुल, अनुपम जाधव, संदीप नागपुरे, नौशाद शेख, भूषण रानडे यांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.
Web Title: Coffee Shops in Sinner City Destroyed by police, privacy of School Boys and girls, encouragement of obscenities
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App