जेष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात
पुणे: एका ६८ वर्षीय जेष्ठ नागरिकाला मुली मागविणे चांगलेच महागात पडलेले आहे. चोरट्यांनी या जेष्ठ नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढवून तब्बल पावणे चार लाखाला फसविले आहे.
याप्रकरणी कॉर्टर गेट या ठिकाणी राहणाऱ्या या ६८ वर्षीय जेष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. सदर प्रकार १३ जुलै पासून सुरु झाला. हा नागरिक घरी असताना त्यांना एक फोन आला त्यात त्यांनी डेटिंगसाठी मुली पुरविण्याचे आश्वासन दिले. नंतर त्या चोरट्यांनी एका साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायला सांगितले. त्यांनतर एका बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यांनी पैसे पाठविले. त्यांनतर दुसऱ्या फोन नंबर वरून फोन करण्यात आला. तुम्ही आता रजिस्ट्रेशन केल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील अशी भीती दाखवण्यात आली. हे रजिस्ट्रेशन रद्द करायचे असेल तर आणखी पैसे द्यावे लागतील. अशाप्रकारे तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आता या जेष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे धाव धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Citizens have to pay dearly for dating girls