Home बुलढाणा समृद्धी महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट, भडका उडाला अन् दोघांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट, भडका उडाला अन् दोघांचा होरपळून मृत्यू

Breaking News | Samruddhi Highway Car Fire two Death: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून वाहनाचा स्फोट होऊन दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना.

Samruddhi Highway Car Fire two Death

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून वाहनाचा स्फोट (Fire) झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.

अपघात दुसरबीड गावाजवळ झाला असून, मुंबईवरून अकोलाकडे जाणाऱ्या कारला हा अपघात झाला. कारला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला.

आगीचा भडका उडाल्याने कारमधील दोघांना बाहेर पडता आले नाही. जखमी व्यक्तीने तत्काळ बाहेर येत जीव वाचवला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर मदतकार्य सुरू झाले.

अपघात एवढा भीषण होता की, महामार्गावर काही वेळासाठी मोठी गर्दी झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असली तरी कार पूर्णतः जळून खाक झाली आहे.

आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र वाहनात तांत्रिक बिघाड झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.  याबाबत पोलीस चौकशी करीत आहे.

Web Title: Samruddhi Highway Car Fire two Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here