Home अहमदनगर अहमदनगर: घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

अहमदनगर: घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

Breaking News | Ahmednagar: करंजी घाटाच्या अवघड वळणाच्या खाली खोल दरीत एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे.

burnt body was found in the ghat

करंजी : नगर- पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटाच्या अवघड वळणाच्या खाली खोल दरीत एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी (दि.७) आढळून आला. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन मृतदेह दरीतून बाहेर काढला.

नगर- पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील माणिकपीर बाबाजवळील अतिशय अवघड वळणाच्या खोल दरीत ४० ते ४५ वयाच्या एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह खोल दरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी काही तरुणांनी त्यांना मदत केली. करंजी घाटात अनोळखी इसमांचे मृतदेह सापडण्याची मालिका थांबता थांबेना. तीन ते चार महिन्यांत अशा घटना घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक मुलगीर, तांबे, लिमकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: burnt body was found in the ghat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here