भाजप पदाधिकारी मंगला भंडारीला भावासह अटक
Breaking News | Nashik Crime: सर्वसामान्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ व पेन्शन मिळवून देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याऱ्या भाजपाची महिला पदाधिकारी मंगला भंडारी यांना तिच्या भावासह अटक.
नाशिक: नाशिकरोड येथील दत्त मंदिर सिग्नलजवळील इमारतीत ‘महिला सशक्तीकरण व भंडारी ग्लोबल सर्व्हिसेस’ नावाचे खासगी कार्यालय थाटून गोरगरिब व सर्वसामान्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ व पेन्शन मिळवून देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याऱ्या भाजपाची महिला पदाधिकारी मंगला भंडारी यांना तिच्या भावासह अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे
मंगला सतीष भंडारी (४६, रा. गुलमोहोर कॉलनी, आनंदनगर, नाशिकरोड), संजय संभाजी भालेराव (४०, रा. गौळाणे रोड, पाथर्डी फाटा) असे दोघा संशयितांची नावे असून, उपनगर पोलिसांनी ‘भंडारी ग्लोबल सर्व्हिसेस’च्या कार्यालयातून संगणक, लॅपटॉप जप्त करुन त्यातील डाटा मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला.
सर्वसामान्य व गरजू गोरगरिब महिलांना शासनाच्या कल्याणकारी योजनांसह कमी-अधिक रकमेची थेट सरकारी पेन्शन सुरु करुन देण्यासाठी भाजप पदाधिकारी व घरकाम मोलकरीन संघटनेची अध्यक्ष मंगला भंडारी, तिचा भाऊ संजय भालेराव या दोघांनी १५०० महिला अर्जदारांकडून प्रत्येकी ६५० रुपयांप्रमाणे एकूण ९ लाख ७५ हजार रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
चैताली प्रकाश गवांदे (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होताच पोलिसांना दोघांना अटक केली आहे. त्यांनी नाशिकरोडच्या दत्त मंदिर सिग्नलजवळील इमारतीत ‘महिला सशक्तीकरण व भंडारी ग्लोबल सर्व्हिसेस’ नावाचे खासगी कार्यालय थाटून गोरगरिबांना स्कीम दिल्याचे उघड झाले आहे.
तसेच, संगनमत करुन नाशिक शहर, येवला, त्र्यंबक, सिन्नर, घोटी व अन्य तालुक्यांतील गोरगरिब महिला व आदिवासीबहुल परिसरातील महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, असे सांगत ‘वैयक्तिक कार्यालयीन कामकाज’च्या नावाखाली ६५० रुपयेप्रमाणे पैसे उकळले आहेत. त्याच्या नोंदी खासगी रजिस्टरमध्ये करत कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज संबंधित शासकीय विभागाकडे जमा करुन लाभ दिला जाईल, असे संशयित सांगायचे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.
Web Title: BJP office bearer Mangala Bhandari arrested along with brother
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study