Breaking News | Sangamner: तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन, एकास अटक.
संगमनेर: शहर पोलिसांनी पुन्हा बाराशे किलो गोमांस पकडले. या कारवाईमध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन, एकास अटक करण्यात आली आहे. भारतनगर गल्ली नंबर १ येथे ही धडक कारवाई यशस्वी करण्यात आली. अदनान इक्बाल कुरेशी (वय १९) असे आरोपीचे नाव आहे.
एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी छापा टाकला असता, मोठ्या प्रमाणात निर्दयीपणे गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळले. १,२०० किलो गोमांसासह ३ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल व कत्तलीसाठी वापरलेला सुरा जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलिस, पोलिस उपाधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून संगमनेरातील कत्तलखान्यांवर सतत छापेमारी सुरू आहे, मात्र तरीही गोवंश हत्या थांबत नाहीत. याप्रकरणी पोलिस शिपाई रोहिदास शिरसाट यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करीत आहे.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी शहरातील कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात काही कत्तलखाने उद्धवस्थ केले, मात्र अद्याप संगमनेरमध्ये गोवंश जनावरांच्या कत्तली खुलेआम सुरूच आहेत. विशेष असे की, वारंवार तेच-तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. आता याप्रकरणी आमदार खताळ नेमकं कोणती भूमिका घेतात, याकडे गोप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Breaking News: Beef caught again in Sangamner