Home क्राईम पत्नीला न पाठविल्याने पतीचा पोलीस ठाण्यासमोरच पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न

पत्नीला न पाठविल्याने पतीचा पोलीस ठाण्यासमोरच पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न

Attempted suicide by pouring petrol in front of Nevasa police station

नेवासा | Nevasa: नेवासा पोलीस ठाण्यासमोर रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान सासऱ्याने पत्नीला सोबत न पाठविल्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या प्रयत्न पतीने केला आहे.

रविवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात उभे होते. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास गणपत पवार हे मोटारसायकलहून पोलीस ठाण्याच्या गेट समोर आले आणि त्यांनी गाडीच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढली व त्यातील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी लगेचच त्याला पकडले. त्याची चौकशी केली.

त्यांनी माहिती दिली तो व त्याची पत्नी दोघे शनिवारी माहेर गोगलगाव ता. नेवासा येथे भेटण्यासाठी गेले पत्नीला माहेरी सोडून पुन्हा शिर्डीला आले. रविवारी सकाळी पुन्हा माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेले त्यावेळी सासू, सासरे यांनी पत्नीला त्यांच्यासोबत जाऊ दिले नाही. त्यामुळे पवार व सासरे यांच्यात वाद झाले. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल घेऊन आल्याचे पवार यांनी सांगितले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सतीश देसाई यांनी फिर्याद दिली असून गणपत दगडू पवार रा. शिर्डी यांच्या विरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Attempted suicide by pouring petrol in front of Nevasa police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here